Join us

PICS : ‘स्वामिनी’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, पाहा लग्नाचा थाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 17:15 IST

1 / 8
बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे
2 / 8
होय, स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा, स्वामिनी या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री सानिका बनारसवाले हिने नुकतीच ऋषभ कठारिया याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
3 / 8
तिनं सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
4 / 8
सानिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अखेर स्वप्न सत्यात उतरलं, असं तिनं हे फोटो शेअर करताना लिहिलं आहे.
5 / 8
सानिकाने ‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ ही मालिका देखील काही दिवसापूर्वी सोडली होती. लग्नासाठी तिनं ही मालिका सोडल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती होती.
6 / 8
स्वामिनी मालिकेत साकारलेली सानिकाने जानकीबाई यांची भूमिका साकारली होती.
7 / 8
नकळत सारे घडले या मालिकेत तिनं साकारलेली स्वातीची भूमिकाही गाजली होती.
8 / 8
सानिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.ती तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी