Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेलकम टू गोवा सिंघम! मराठी अभिनेत्रीची पहिलीच domestic फ्लाईट; ग्लॅमरस लूकमध्ये दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:36 IST

1 / 8
गोवा हे फिरण्यासाठीचं अनेकांचं आवडतं ठिकाण. सेलिब्रिटीही गोव्यात जाऊन धमाल करतात. एक मराठी अभिनेत्री नुकतीच पहिल्यांदाच गोव्यात पोहोचली आहे.
2 / 8
अभिनेत्रीने गोव्यातील विविध ठिकाणांहून फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे ती गोव्याला पहिल्यांदाच गेलीये असं दिसतंय.
3 / 8
ही अभिनेत्री आहे रुचिरा जाधव. ती गोव्याला कामासाठी आणि फिरायलाही गेली होती असं तिने म्हटलं आहे. तसंच ही तिच्या फॅशनवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
4 / 8
रुचिरा कायम ग्सॅमरस लूकमध्ये दिसते. तिच्या व्हेकेशन फोटोंची चर्चा असते. निऑन ग्रीन रंगाच्या स्कीन टाईट शॉर्ट वनपीसमध्ये ती कमालीची हॉट दिसत आहे.
5 / 8
डोक्यावर हॅट, पायात स्लीपर आणि गोव्यातलं ऊन अशा वातावरणात तिने फोटोशूट केलंय. मागे समुद्र आणि पुढे रुचिरा स्टाईलमध्ये पोज देत आहे.
6 / 8
तसंच तिने गोव्यातील प्रसिद्ध मंगेशी मंदिरालाही भेट दिली. गुलाही कुर्ता, ब्लू जीन्स, कानात झुमके असा तिचा साधा लूक दिसत आहे ज्यातही ती सुंदर दिसत आहे.
7 / 8
रुचिराने गोव्यात शॉपिंग आणि तिथलं फूडही एन्जॉय केलं. याचीही झलक तिने फोटोंमधून दाखवली आहे.
8 / 8
'वेलकम टू गोवा सिंघम', लोक नेहमी त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्रीपचे फोटो शेअर करतात. पण मी ९-१० आंतरराष्ट्रीय ट्रीपनंतर माझ्या पहिल्या डोमॅस्टिक ट्रीपचे फोटो शेअर करत आहे. आणि ही ट्रीप गोव्याची आहे. गोव्याची बातच काही और आहे.', असं कॅप्शन तिने लिहिलं आहे.
टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारगोवा