'बिग बॉस' फेम अभिनेत्यासोबत होतं रिलेशनशिप, ६ वर्षांनी ब्रेकअप झालं अन्...; ही मराठी अभिनेत्री कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 11:11 IST
1 / 10सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा कलाकार त्यांचे फोटो शेअर करताना दिसतात. 2 / 10आतादेखील एका मराठी अभिनेत्रीच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोत अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. 3 / 10डीप नेक आणि बॅकलेस ड्रेसमध्ये अभिनेत्रीने तिच्या परदेशातील व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. 4 / 10फोटोत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रेवती लेले आहे. रेवतीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 5 / 10स्वामिनी या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने रमाबाई पेशवे यांची भूमिका साकारली होती. 6 / 10'विठु माऊली', 'गुलमोहर', 'वर्तुळ', 'ललित २०२५' या मालिकांमध्येही ती दिसली होती. 7 / 10तर लग्नाची बेडी या मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत होती. अलिकडेच या मालिकेने निरोप घेतला. 8 / 10रेवती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. रेवती आणि बिग बॉस मराठी फेम अभिनेता आदिश वैद्य एकमेकांना डेट करत होते. 9 / 10रेवती आणि आदिश ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण, नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. 10 / 10रेवती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.