डोक्यावर पदर अन् शाही थाट, प्राजक्ता माळीने केला जयपूरच्या महाराणीसारखा लूक, चाहते म्हणाले- "तू तर महाराष्ट्राची..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:31 IST
1 / 7प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री. अनेकांचा क्रश असलेली प्राजक्ता चाहत्यांना नेहमीच सरप्राइज करत असते. 2 / 7अभिनयासोबतच प्राजक्ता ओळखली जाते ती तिच्या फॅशनसाठी. नेहमीच ती वेगवेगळे लूक ट्राय करताना दिसते. 3 / 7नुकतंच प्राजक्ताने राजेशाही थाटात फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 4 / 7या फोटोंमध्ये प्राजक्ताने साडी नेसत त्यावर मोत्याचे दागिने घातले आहेत. 5 / 7या लूकमध्ये प्राजक्ता एखाद्या महाराणीसारखी दिसत आहे. अभिनेत्रीचा शाही रुबाब पाहायला मिळत आहे. 6 / 7जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी यांना हा लूक अभिनेत्रीने समर्पित केला आहे. 7 / 7तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. 'तू तर महाराष्ट्राची राणी आहेस', 'राणी सरकार', 'खूप सुंदर' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.