1 / 8मराठी टेलिव्हिजनविश्वातील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनय कौशल्यामुळे लक्ष वेधून घेत आहेत. इंडस्ट्रीत अनेक नवे कलाकार अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत.2 / 8अशीच एक मराठी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे.3 / 8नुकतंच अभिनेत्रीने समुद्रकिनारी हे सुंदर फोटोशूट केलं आहे. लाल रंगाच्या साडीत ती समुद्रकिनारी फिरत आहे. यादरम्यान काढलेले फोटो काळजाचा ठोका चुकवणारे आहेत.4 / 8तिच्या प्रत्येक अदाकारीवर आणि पोजवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तसंच तिचं सौंदर्य वेड लावणारं आहे. कोण आहे ही अभिनेत्री?5 / 8ही अभिनेत्री आहे रसिका वाखारकर (Rasika Wakharkar). लाल रंगाची बांधणी साडी, व्ही नेक ब्लाऊज, मोकळे केस आणि कातिल नजर अशा लूकमध्ये तिचं हे फोटोशूट आहे.6 / 8 रसिका सध्या 'अशोक मा.मा.' मालिकेत भैरवीचं पात्र साकारत आहे. या भूमिकेतून तिला बरीच लोकप्रियता मिळाली आहे.7 / 8रसिकाने याआधी 'पिरतीचा वनवा उरी पेटला' मालिकेत 'सावी' ही भूमिका साकारली होती. ती तिची पहिलीच मालिका होती. याशिवाय रसिकाने 'अथांग' या मराठी वेबसीरिजमध्येही काम केलं होतं.8 / 8रसिकाने 'मेकअप' आणि 'साईड मिरर' या मराठी सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.