Join us

बोलके डोळे अन् मोहक हास्य! 'नशीबवान' मालिकेतील आदिनाथची नायिका कोण? चित्रपटातही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:05 IST

1 / 7
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच 'नशीबवान' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सर्वत्र या मालिकेचीच चर्चा आहे.
2 / 7
अभिनेता आदिनाथ कोठारे, अजय पूरकर आणि सोनाली खरे यांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे.
3 / 7
त्याचबरोबर मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री नेहा नाईक झळकणार आहे. श्रीमंत बापाची मुलगी असूनही गरिबाच्या घरात ती लहानची मोठी होते. याचा प्रत्यय प्रोमो पाहून येतो.
4 / 7
'नशीबवान' मालिकेत नेहा आदिनाथ कोठारेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. परंतु,तुम्हाला माहितीये का?
5 / 7
या मालिकेपूर्वी नेहा नाईकने रंगभूमीवरही काम केलं आहे. काही शॉर्ट्स फ्लिल्मसमध्येही ती झळकली आहे.
6 / 7
बोलके डोळे आणि मोहक हास्य असणारी ही अभिनेत्री आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
7 / 7
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या सिनेमात देखील तिने काम केलं आहे. या चित्रपटात ती संत मुक्ताबाईंच्या मुख्य भूमिकेत झळकली होती.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी