Join us
Daily Top 2Weekly Top 5

Aishwarya Narkar : एव्हरग्रीन ऐश्वर्या ! वयाच्या पन्नाशीतही मराठमोळ्या ऐश्वर्या नारकर यांच्या दिलखेचक अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 13:07 IST

1 / 8
‘या सुखांनो या’ मालिकेतील हळवी भूमिका असो आणि आता ‘लेक माझी लाडकी’ मालिकेतील निगेटिव्ह भूमिका ऐश्वर्या नारकर यांनी कायम आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना चाहत्यांचे प्रेम मिळत आले आहे.
2 / 8
नाटक, मालिका आणि चित्रपटातून भेटणारी ही गोड चेहऱ्याची आणि सुंदर हास्याची अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांनी पाहिले जाते.वयाच्या ५२ व्या वर्षीही तरुणींनाही लाजवेल असे त्यांचे मनमोहक रुप आहे. त्यांच्याकडे बघून अनेकांना वयाचा अंदाजही येणार नाही.
3 / 8
नाटक आणि सिनेमांपेक्षा त्यांनी मालिकेकांमध्ये जास्त काम केले आणि त्यामुळे त्या घराघरात पोहोचल्या. प्रत्येक घरातील गृहिणींच्या तर त्या लाडक्या झाल्या. महिलांसाठी त्या कायम आदर्शच राहिल्या.
4 / 8
ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावरही बऱ्याच सक्रिय आहेत. त्यांनी नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे ज्यावर कोण आहे ही गोड मुलगी, किती सुंदर अशा कमेंट येत आहेत. ते खरेच आहे म्हणा त्यांचा फोटो पाहून भलेभले त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्या सौंदर्यावर आजही अनेक जण फिदा आहेत.
5 / 8
ऐश्वर्या नारकर सध्या त्या सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत सासूची भूमिका साकारत आहेत.यामध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिकाही तेवढीच उत्तमरित्या निभावली आहे.
6 / 8
वयाच्या ५२व्या वर्षी सुद्धा त्यांनी स्वतःला अगदी फिट ठेवले आहे. त्यांना व्यायामाची आणि फिरण्याची प्रचंड आवड आहे.
7 / 8
साडीतील लुक असो किंवा वेस्टर्न लुक त्या कोणत्याही रुपात सुंदरच दिसतात. तरुण पिढीही त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करते.
8 / 8
ऐश्वर्या नारकर अनेकदा पती अविनाश नारकर व मुलगा अमेय नारकर यांच्यासोबत रील्स सुद्धा शेअर करत असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर १ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :मराठी अभिनेताऐश्वर्या नारकर