Join us

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याचं वेडिंग फोटोशूट, कोण आहे बायको? शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:31 IST

1 / 7
'आई कुठे काय करते' या गाजलेल्या मालिकेत अभिषेक देशमुखच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता निरंजन कुलकर्णी (Niranjan Kulkarni) नुकताच लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नाची कानोकान कोणालाही खबर नव्हती.
2 / 7
निरंजनने कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत डेस्टिनेशन वेडिंग केलं. याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
3 / 7
निरंजनची बायको नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. तर त्याच्या बायकोचं नाव मनीषा गुरम (Manisha Guram) आहे. तिने सोशल मीडियावर वेडिंग फोटो शेअर करत लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
4 / 7
मनीषाने निरंजनचं कौतुक करत लिहिले, 'बडीज कॅफे उभं करण्यापासून ते मला माझ्या स्वप्नांमध्ये पाठिंबा देण्यापर्यंत, न्यूट्रिशन क्षेत्रातील माझं पॅशन, ड्रायव्हिंग आणि स्वत:ची कार घेण्यापर्यंत तू माझ्यामागे खंबीरपणे उभा होतास.'
5 / 7
'आपल्या लग्नाचा दिवस सहज साजरा करता आला पण तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या असण्याने तो आणखी अविस्मरणीय झाला. आपलं बंधन काळानुसार आणखी घट्ट होत गेलं. तेव्हापासून आपलं आयुष्य आनंदी झालं.'
6 / 7
'एकमेकांसोबत आपण अॅडव्हेंचर अनुभवलं, बरेच ठिकाणं फिरलो आणि आज आपल्याकडे आठवणींचा खजिनाच आहे. मी आणखी जास्त तुझ्या प्रेमात पडत गेले. तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी कायम आभारी आहे.'
7 / 7
निरंजनची बायको मनीषा ही न्यूट्रिशनिस्ट आणि लाईफस्टाईल एक्सपर्ट आहे. ती योग आणि नॅचरोपॅथीही शिकली आहे. तिच्या सोशल मीडियावर ही माहिती लिहिली आहे.
टॅग्स :मराठी अभिनेताआई कुठे काय करते मालिकालग्न