मराठी अभिनेत्याने दिली 'बिग बॉस'ची हिंट? म्हणाला, "काही दिवस मी इन्स्टाग्रामवर नसेन, माझी टीम..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:04 IST
1 / 8मराठी मनोरंजनविश्वात सध्या बिग बॉस मराठी ६ ची उत्सुकता आहे. येत्या काही दिवसात म्हणजेच ११ जानेवारीपासून बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सुरुवात होत आहे.2 / 8यावेळीही रितेश देशमुखच सीझन होस्ट करणार आहे. भाऊंचं होस्टिंग, भाऊचा धक्का असं सगळंच प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे.3 / 8गेल्या सीझनमध्ये गायक, इन्फ्लुएन्सर्स, रीलस्टार, अभिनेता, अभिनेत्री, जेष्ठ कलाकार, हिंदीतला चेहरा अशी काही मंडळी सहभागी झाली होती.4 / 8या सीझनमध्ये कोणकोणते चेहरे सहभागी होणार याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक नावं समोरही आली आहेत जे बिग बॉसच्या घरात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.5 / 8अनुश्री माने, सागर कारंडे, राधा पाटील, ईशा केसकर, संकेत पाठक, सोनाली राऊत, डॅनी पंडित, दीपाली सय्यद या नावांची जोरदार चर्चा आहे. 6 / 8दरम्यान एका टीव्ही अभिनेत्याने नुकतीच एक पोस्ट केली आहे. काही दिवस मी स्वत: इन्स्टाग्रामवर नसेन. माझी टीम अकाऊंट हँडल करेल असं त्याने लिहिलं आहे.7 / 8हा अभिनेता आहे 'बॉस माझी लाडाची','३६ गुणी जोडी' या मालिकांमध्ये दिसलेला आयुष संजीव. आयुषच्या या पोस्टवरुन तो बिग बॉस मध्ये जातोय हे जवळपास कन्फर्मच झालं आहे. 8 / 8आयुषच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत 'तू बिग बॉस मध्ये जातोय' असा अंदाज लावला आहे. तसंच त्याला या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अद्याप वाहिनीकडून किंवा आयुषने यावर अधिकृत कन्फर्मेशन दिलेलं नाही.