एमबीएचं शिक्षण, ७ वर्षे कॉर्पोरेट जॉब! 'अशी' जपली अभिनयाची आवड, लवकरच कमबॅक करतोय 'हा' अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:29 IST
1 / 7अभिनयची ओढ ही अनेकांना आपलं प्रोफेशन सोडून मनोरंजन विश्वाकडे आकर्षित करते, असाच एक अभिनेता ज्याने एमबीएचं शिक्षण पूर्ण करुन आणि कॉर्पोरेट जॉब सोडून अभिनयाची वाट धरली. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया...2 / 7हा अभिनेता म्हणजे अमित परब. झी मराठी वाहिनीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेत नयन कानविंदेची भूमिका साकारुन घराघरात पोहोचला. 3 / 7पहिल्याच मालिकेतू तो प्रचंड लोकप्रिय झाला. अमित परब हा मुळचा कोकणातील कणकवलीचा आहे. त्याचे वडील हे सरकारी नोकरी करत होते. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही अमितने कलाविश्वात एन्ट्री घेत स्वत चं हक्काचं स्थान निर्माण केलं. 4 / 7अमित परबने एमबीए केलं असून तो जवळपास सात वर्ष कोर्पोरेट क्षेत्रात जॉब करत होता. 5 / 7लॉरिअल पॅरिस आणि हिमालया यांसारख्या कंपन्यांमध्ये मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह म्हणून त्याने काम पाहिलं आहे. 6 / 7त्यात आता अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीने 'हळद रुसली, कुंकू हसलं' या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेत समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकरसह अमित परबची वर्णी लागली आहे. 7 / 7या मालिकेत अभिनेता जयकांत रांगणे पाटील नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. येत्या ७ जुलैपासून ही मालिका रोज दुपारी १.०० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.