Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी असूनही "डे" आडनाव का लावते ईशा? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सांगितलेलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:54 IST

1 / 9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री ईशा डे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ईशाने अभिषेक खाणकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.
2 / 9
ईशाचा नवरा अभिषेक हा एक गीतकार असून त्याने काही मालिका आणि सिनेमांसाठी काम केलं आहे.
3 / 9
ईशा डे ही महाराष्ट्रीयन आहे. मराठी असूनही ईशा डे आडनाव का लावते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो.
4 / 9
एका मुलाखतीत ईशाने यामागचं कारण सांगितलं होतं. ईशाने लंडनमधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. तिथे असतानाच तिने नावात बदल केला.
5 / 9
ईशा म्हणाली होती 'मी लंडन स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत होते. तिथे स्टेज नेम, स्क्रिन नेम घेण्याची पद्धत आहे. मी तिथे ऑडिशनसाठी जायचे तेव्हा माझं नाव ते विचारायचे'.
6 / 9
'माझं खरं नाव ईशा वडनेरकर आहे. माझ्या आडनावाबद्दल जाणून घेण्यात त्यांना इंटरेस्ट वाटायचा. पण त्यामध्ये ऑडिशनच्या १५ मिनिटांच्या स्लॉटमधला बराचसा वेळ निघून जायचा'.
7 / 9
'माझे जे ट्यूटर होते त्यांनी मला सांगितलं की इथे सगळे वेगळं नाव घेतात त्यामुळे तूदेखील घेऊ शकतेस. मग मी याबद्दल आईबाबांशी बोलले. आम्ही एकत्र बसून वेगवेगळी आडनावं काढली'.
8 / 9
'मला सोपा शब्द हवा होता आणि त्यातून मी भारतीय असल्याचंही दाखवायचं होतं. मग अनेक नावांमधून ईशा डे हे नाव फायनल केलं', असं ईशा म्हणाली होती.
9 / 9
ईशाने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. हास्यजत्रेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार