1 / 7मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मधुरा वेलणकर. मधुराला आपण विविध सिनेमा, मालिका, नाटकांत अभिनय करताना पाहिलंय. मधुराची सख्खी बहीणही अभिनेत्री हे फार कमी जणांना माहित असेल2 / 7मधुरा वेलणकरच्या बहिणीचं नाव आहे मीरा वेलणकर. मधुरा आणि मीरा या सख्ख्या बहिणी असून दोघीही मनोरंजन विश्व गाजवत आहेत.3 / 7ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या या दोन मुली. वडीलांच्या पावलावर पाऊल ठेऊन आज मीरा-मधुरा या वेलणकर भगिनी रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत.4 / 7मीरा वेलणकर यांनी प्रेमाची गोष्ट या सिनेमात साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय त्यांनी बटरफ्लाय या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 5 / 7मीरा वेलणकर यांना अलीकडेच शिवा मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यांनी साकारलेली सीताईची भूमिका चांगलीच गाजली.6 / 7मीरा वेलणकर यांनी झी मराठीच्या तू तेव्हा तशी मालिकेत चित्रलेखाची भूमिका साकारली होती. अशाप्रकारे मीरा विविध माध्यमांत सक्रीय आहेत.7 / 7मधुरा आणि मीरा या दोन्ही बहिणींचा एकमेकांच्या करिअरला सपोर्ट आहे. दोघींविषयी मराठी मनोरंजन विश्वात आदर आहे. कलाक्षेत्रासाठी त्यांनी वाहून घेतलं आहे.