By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:33 IST
1 / 7काहीच दिवसांपूर्वी लग्न झालेली ही अभिनेत्री आता पतीसोबत हनिमूनला गेली आहे. अभिनेत्रीचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत.2 / 7ही अभिनेत्री म्हणजे रेवती लेले. स्वामिनी, लग्नाची बेडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्य रेवती लेलेने २० फेब्रुवारीला एकमेकांशी लग्न केलं.3 / 7लग्नानंतर रेवतीने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. रेवती एका खास ठिकाणी हनिमूनला गेली आहे.4 / 7रेवती तिचा पती कौशिक भिडेसोबत व्हिएतनामला गेली आहे. व्हिएतनामला जाऊन रेवतीने पतीसोबत खास पोज देऊन फोटोशूट केलं आहे.5 / 7रेवतीने सोलो फोटोशूट सुद्धा केलं असून तिचा पती कौशिक भिडेने पत्नीचे हे सुंदर फोटो काढले आहेत. दोघांमधली खास रोमँटिक केमिस्ट्री खुलून आलेली दिसतेय6 / 7रेवती आणि कौशिकच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रेवतीने शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत पतीसोबत ही खास ट्रीप केली7 / 7 २० फेब्रुवारीला रेवती आणि कौशिक भिडे लग्नबंधनात अडकले. अभिनेत्री रेवती लेले आणि कौशिक भिडे यांचं पुण्यात मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. काही महिन्यांपूर्वीच रेवती लेलेने सोशल मीडियावर होणाऱ्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत तिच्या नात्याची कबुली दिली होती