Join us  

‘खतरों के खिलाड़ी 11’चा सर्वात महागडा स्पर्धक कोण? कुणी किती घेतली रक्कम?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 1:58 PM

1 / 10
सर्वात आधी बोलुयात ते या शोचा होस्ट रोहित शेट्टीबद्दल. पाचव्या सिझनपासून रोहीत हा शो होस्ट करत आहे. रिपोर्ट्स नुसार रोहित प्रति एपिसोड 49 लाख रुपये घेत आहे.
2 / 10
‘खतरों के खिलाड़ी 11’चा सर्वात महागडा स्पर्धक कोण? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर त्याचे नाव आहे राहुल वैद्य. बिग बॉस 14 फेम राहुल वैद्यने ‘खतरों के खिलाड़ी 11’साठी सर्वात जास्त रक्कम घेतली आहे. रिपोर्टनुसार, प्रति एपिसोड 15 लाख रुपये तो घेत आहे.
3 / 10
राहुल पाठोपाठ दुसरा नंबर आहे तो छोट्या पडद्याची स्टार दिव्यांका त्रिपाठी हिचा. तिने प्रतिएपिसोड 10 लाख रुपये घेतल्याचे कळते.
4 / 10
अभिनेता अर्जुन बिजलानी हा सुद्धा ‘खतरों के खिलाड़ी 11’मध्ये दिसणार आहे. त्याने प्रत्येक एपिसोडसाठी 7 लाख वसूल केल्याचे रिपोर्टमधून कळते.
5 / 10
टीव्हा सर्वाधिक लोकप्रिय चेहरा म्हणजे श्वेता तिवारी. ती सुद्धा या शोमध्ये खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे. या शोच्या प्रत्येक एपिसोड 4 लाख रुपये घेतल्याचे कळते.
6 / 10
‘खतरों के खिलाड़ी 11’मध्ये सर्वाधिक लहान वयाची अभिनेत्री अनुष्का सेन हिने प्रति एपिसोड 5 लाख रुपये घेतल्याचे रिपोर्ट सांगतो.
7 / 10
बिग बॉस 14 मध्ये निक्की तंबोलीचे नखरे तुम्ही पाहिलेच. हीच निक्की आता ‘खतरों के खिलाड़ी 11’मध्ये दिसणार आहे. रिपोर्टनुसार, तिने प्रति एपिसोड 4.43 लाख रुपये घेतले.
8 / 10
बिग बॉस 14 फेम आणि टीव्ही अभिनेता अभिनव शुक्ला प्रति एपिसोड 4.25 लाख रुपये मानधन घेतले.
9 / 10
टीव्ही अभिनेता वरुण सूद ‘खतरों के खिलाड़ी 11’च्या प्रत्येक एपिसोडसाठी 3.83 लाख रुपये वसूल केलेत.
10 / 10
तर अभिनेता विशाल आदित्य सिंगने प्रति एपिसोड 3.34 लाख रुपयांत हा शो केल्याचे रिपोर्ट सांगतो.