Kapil Sharma : कपिल शर्माला शोमध्ये ‘हा’ शब्द वापरण्यास आहे मनाई; चॅनलने घातलीये बंदी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 16:17 IST
1 / 8प्रसिद्ध अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्मा याचा ‘झ्विगॅटो’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या सिनेमातील कपिलच्या अभिनयाचं वारेमाप कौतुक झालं.2 / 8द कपिल शर्मा शोमुळे कपिल घराघरात पोहोचला. अर्थात आपल्या कारकिर्दीत त्याने अनेक चढउतार पाहिलेत. परंतु, तरीही त्याच्या करिअरचा आलेख नेहमी चढताच राहिला.3 / 8आता चर्चा आहे ती कपिल शर्माच्या द कपिल शर्मा या शोची. होय, या शोबद्दल कपिलने एक मोठा खुलासा केला आहे.4 / 8 नुकतंच कपिल शर्मा करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या टॉक शो मध्ये आला होता. या शोमध्ये त्याने एक खुलासा केला आणि तो ऐकून सगळेच थक्क झालेत. 5 / 8होय, द कपिल शर्मा शोमध्ये एक शब्द वापरण्यास कपिल शर्माला सक्त मनाई करण्यात आली आहे. तो एक शब्द वापरायचा नाही, अशी ताकिद त्याला चॅनलने दिली आहे.6 / 8कपिल म्हणाला, माझ्या चॅनलने शो मध्ये ‘पागल’ हा शब्द वापरण्यावर माझ्यावर बंदी घातली आहे. मी हा शब्द वापरू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.7 / 8या शब्दामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात म्हणून शोमध्ये तो वापरण्यास बंदी आहे, असंही त्याने सांगितलं. असा शब्द शो मध्ये कोणासाठी वापरल्याने गैरसमज निर्माण होऊ शकतात, असं कारण चॅनलच्या वतीने दिलं गेल्याचा खुलासाही त्याने केला.8 / 8कॉमेडी करणं सोप्प नाही. अलीकडे कॉमेडियन्सला शब्द वापरताना अतिशय जपून वापरावे लागतात. आजच्या काळात काॅमेडी म्हणजे फारच क्लिष्ट विषय झाला आहे, त्यामुळे स्क्रिप्ट लिहितांना अतिशय दक्ष राहावं लागतं, असंही तो म्हणाला.