Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधीकाळी ठरले होते 'मोस्ट लव्हेबल' कपल, जय-माहीच्या फिल्मी लव्ह स्टोरीचा घटस्फोटाने शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 16:54 IST

1 / 11
अभिनेत्री माही विज आणि जय भानुशाली यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या आणि दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अखेर स्वत: माही वीजनंच यावर पूर्णविराम देत जयपासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.
2 / 11
या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल १५ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी हा निर्णय घेतला आहे. तसंच हा निर्णय त्यांनी शांततेने, परस्पर समजुतीने आणि एकमेकांप्रती असलेल्या आदराने घेतला असल्याचंदेखील सांगितलं आहे.
3 / 11
माही विज आणि जय भानुशाली यांनीढ स्पष्ट केले की, जरी पती-पत्नी म्हणून त्यांचे मार्ग वेगळे झाले असले, तरी ते कायम चांगले मित्र राहतील आणि एकमेकांना पाठिंबा देत राहतील.
4 / 11
जय आणि माही यांची प्रेमकहाणी अतिशय फिल्मी होती. एका मित्राच्या पार्टीत त्यांची पहिली भेट झाली, पण तेव्हा त्यांच्यात फारसं बोलणं झालं नाही. पुन्हा एका भेटीत त्यांच्यात मैत्री झाली.
5 / 11
३१ डिसेंबर २००९ मध्ये जयने माहीला लग्नसाठी प्रपोज केले, त्यांनी २०१० मध्ये गुपचूप लग्न उरकले होते. जवळपास वर्षभरासाठी त्यांनी हे नाते सर्वांपासून लपवले.
6 / 11
एका पार्टीत माहीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसले आणि त्यांचे हे गुपित उघड झाल्याचं बोललं जातं. त्यानंतर जय भानुशाली आणि माही विजने ११ नोव्हेंबर २०११ मध्ये पुन्हा लग्न केलं.
7 / 11
जय आणि माही यांना तारा ही स्वतःची मुलगी आहे. त्याआधी २०१७ मध्ये त्यांनी खुशी आणि राजवीर या दोन मुलांना दत्तक घेतले होते.
8 / 11
निवेदनात म्हटल्यानुसार, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आणि शांततेसाठीच त्यांनी सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे.
9 / 11
जय आणि माही दोघांचेही आपल्या मुलांंवर खूप प्रेम आहे. ते मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसून येतात.
10 / 11
जय भानुशाली व माही विज यांनी मालिकांमध्ये नायक व नायिका म्हणून काम केलं आहे. तर, जय अनेकदा शोचं सूत्रसंचालन करतानाही दिसतो. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.
11 / 11
माही विजनं ९ वर्षांनंतर 'सहर होने को है' या मालिकेतून पुनरागमन केलं आहे. जिथे ती आईची भूमिका साकारतेय.
टॅग्स :जय भानुशालीटिव्ही कलाकारघटस्फोट