'हप्पू की उलटन पलटन' मालिकेत नव्या अभिनेत्रीची होणार एंट्री, त्याआधी पाहा तिच्या या ग्लॅमरस अदा By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 2:21 PM1 / 12मालिकेमध्ये लवकरच नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. मलायकाची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री जसनीत कौर कांत.2 / 12मुंबईमध्येच लहानाची मोठी झालेली जसनीतने यापूर्वीही काह मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 3 / 12मलायका ही दबंग वृत्ती असलेल्या टॉमबॉयसारखी आहे, तर जसनीतचे व्यक्तिमत्त्व अत्यंत मितभाषी आहे. 4 / 12या दोघींमधील साम्य म्हणजे जसनीत आणि तिची रील भूमिका मलायका या दोघींचाही त्यांचे जिवलग मित्रमैत्रिणी व कुटुंबांप्रती संरक्षणात्मक स्वभाव आहे, म्हणूनच मलायकाच्या भूमिकेसाठी जसनीत योग्य आहे. 5 / 12पलटन मालिकेचा भाग होणे नक्कीच एक्सायटमेंट आहे. खासकरुन ''मला मलायकाची भूमिका आवडली आहे. 6 / 12ती वेगळी असली तरी माझ्यासारखीच आहे. मला खूप आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही घडलेली सर्वोत्तम गोष्ट आहे. 7 / 12टीव्ही मालिका व रंगभूमीवर लहानशा भूमिका साकारल्यानंतर मी मालिकेमध्ये योग्य भूमिका मिळण्याबाबत खूपच आनंदी आहे.8 / 12ज्यासाठी मी अनेक ऑडिशन्स दिल्या. अखेर मालिका 'हप्पू की उलटन पलटन'साठी मला निवडण्यात आले. 9 / 12मी मालिका पाहत आली आहे आणि नेहमीच मालिका व त्यामधील पात्रांनी सराईतपणे सादर केलेल्या विनोदांचे कौतुक करत आली आहे. 10 / 12असे प्रतिभावान कलाकार अवतीभोवती असल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला दररोज नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. 11 / 12मी भूमिका साकारण्यास सज्ज असताना यावेळी प्रेक्षकांना दबंग मलायकाचा नवीन अवतार पाहायला मिळेल. 12 / 12 आता प्रेक्षक 'नवीन मलायका काय नवीन घेऊन येत आहे?' हे जाणून घेण्यास उत्सुक असतील.'' आणखी वाचा Subscribe to Notifications