Join us

५ वर्षांपासून गायब आहे 'जोधा अकबर'मधील जलाल, सध्या काय करतोय रजत टोकस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 09:21 IST

1 / 8
टीव्ही इंडस्ट्रीतील एक अभिनेता ज्याने वर्षानुवर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं. त्याला टेलिव्हिजनचा किंग देखील म्हटलं जातं, परंतु तो बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यावरून गायब आहे. तो गेल्या ५ वर्षांपासून कोणत्याही मालिकेत झळकला नाही.
2 / 8
जोधा अकबर मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप आवडले. सर्वात जास्त म्हणजे, जलालची भूमिका करणाऱ्या रजत टोकसचा अभिनय आणि शैली लोकांना खूप भावली.
3 / 8
जोधा अकबरमध्ये जलालची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणारा रजत टोकस गेल्या ५ वर्षांपासून कोणत्याही मालिकेत दिसला नाही.
4 / 8
रजत टोकसने २०१९ मध्ये मार्वलच्या निर्मात्यांशी संपर्क साधून वॉल्व्हरिन म्हणून कास्ट करण्यासाठी विचारणा केली होती.
5 / 8
या मोहिमेत त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरही त्याला पाठिंबा दिला पण अभिनेत्याला फक्त निराशाच मिळाली.
6 / 8
रिपोर्ट्सनुसार, २०२३ मध्ये रजत टोकसचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते, ज्यामुळे तो सोशल मीडियापासूनही दूर गेला.
7 / 8
मात्र, तो पुन्हा सोशल मीडियावर परतला. परंतु, रजत टोकसने १९ जुलै २०२४ रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली.
8 / 8
सध्या, रजत टीव्ही इंडस्ट्रीमध्ये किंवा इंस्टाग्रामवर सक्रिय नाही. तो आता काय करत आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही.