1 / 7अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या चर्चेत असते. भारत-पाक तणावाच्या परिस्थितीत ती सतत पोस्ट शेअर करत देशाच्या बाजूने उभी होती. 2 / 7वैयक्तिक जीवनात हिना कठीण प्रसंगांना सामोरी जात आहे. ती ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. मात्र तरी जवळच्या लोकांबरोबर ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे.3 / 7हिना सध्या बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत कोरियामध्ये फिरण्याचा आनंद लुटत आहे. हिनाने तिचे हे व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.4 / 7हिना साउथ कोरियातील अनेक टुरिस्ट ठिकाणांवर फिरत आहे. तिथल्या अन्नपदार्थाचाही आस्वाद घेत आहे. तसंच तिथलं निसर्गसौंदर्य अनुभवत आहे.5 / 7साउथ कोरियाच्या नॉर्थ ईस्ट भागात ती प्रवास करत आहे. हिनाने यावेळी पांढऱ्या निळ्या रंगाचा प्रिंटेड लाँग ड्रेस आणि त्यावर लाँग ओव्हरकोट घात आहे.6 / 7शॉर्ट हेअरस्टाईलमध्ये हिना खूपच क्युट दिसत आहे. यावर तिने साजेसी अॅक्सेसरी घातली आहे. त्यांनी येथील बीचवरही फिरण्याचा आनंद घेतला आहे.7 / 7हिना आणि रॉकीने तेथील म्युझियमलाही भेट दिल्याचं फोटोंमधून दिसत आहे. म्युझियममधील लाईट शो भारावणारा आहे.