By देवेंद्र जाधव | Updated: August 6, 2025 13:34 IST
1 / 7प्रियदर्शनी इंदलकर ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शनीने एका मुलाखतीत पहिल्यांदाच तिच्या बहिणीबद्दल खुलासा केला.2 / 7प्रियदर्शनीच्या बहिणीचं नाव आहे मधुमती इंदलकर. प्रियदर्शनी आणि मधुमती या बहिणींचं खास नातं आहे.3 / 7प्रियदर्शनी आणि मधुमती या सख्ख्या बहिणी नसून त्या चुलत बहिणी आहेत. परंतु तरीही प्रियदर्शनीचं मधुमतीसोबत सख्ख्या बहिणीसारखंच नातं आहे 4 / 7मधुमती इंदलकर ही प्रियदर्शनीपेक्षा वयाने मोठी आहे. त्यामुळे मोठ्या बहिणीप्रमाणेच मधुमती प्रियदर्शनीला प्रेमाने ओरडत असते.5 / 7मधुमतीला डाऊन सिंड्रोम आहे. परंतु प्रियदर्शनी आणि तिचं कुटुंब कधीही तिला वेगळी वागणूक देत नाहीत. सामान्य माणसासारखंच मधुमतीला वागवलं जातं.6 / 7मधुमती सुद्धा एक अभिनेत्री आणि डान्सर आहे. इतकंच नव्हे तिने स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारताला सिल्व्हर मेडल जिंकून दिलंय.7 / 7युनिकनेस विथ दिस अॅबिलिटी या युट्यूब चॅनलवर प्रियदर्शनीने बहिणीचं कौतुक केलं. स्पेशल ऑलिम्पिकमध्ये Bocce या खेळात मधुमतीने सिल्व्हर मेडल पटकावलं आहे