Join us  

असले चाळे करू नकोस...! ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचे हे फोटो पाहून चाहतेही झालेत थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 1:17 PM

1 / 10
‘तुला पाहते रे’ या मालिकेतील ईशा म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली अभिनेत्री गायत्री दातारचे ताजे फोटो पाहाल तर थक्क व्हाल.
2 / 10
होय, अगदी आली लहर केला कहर, असे हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल. गायत्री दातार तशी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. पण तिचा हा अवतार काहीसा वेगळाच म्हणायला हवा.
3 / 10
विविध फोटोशूटमधून गायत्री सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. पण आताश: गायत्रीने हटके फोटोशूटमधून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये गायत्रीने निळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर काळ्या रंगाची लिप्स्टीक लावली आहे.
4 / 10
हे फोटो शेअर करत तिने ‘बिर्यानी खाताना जेव्हा तुम्ही वेलची खाता’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
5 / 10
गायत्रीचे हे फोटोशूट पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. काहींनी तर यावरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. कोळसा खाऊ नये, असा सल्ला एका चाहत्याने तिचे हे फोटो पाहिल्यानंतर तिला दिला आहे.
6 / 10
मिशरी लावू नकोस ताई, असे एका युजरने लिहिले.
7 / 10
अर्थात काहींनी तिचे कौतुकही केले. कडक दिसतेय, हा लूक तुझ्यावर खुलून दिसतो, अशा प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिल्यात.
8 / 10
‘तुला पाहते रे’ ही गायत्रीची पहिला मालिका होती. या मालिकेत तिने साकारलेल्या साधाभोळ्या इशाची भूमिका रसिकांना प्रचंड आवडली होती.
9 / 10
पण आता इशा साधीभोळी इशा राहिलेली नाही. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही याची खात्री पटेल.
10 / 10
गायत्री दातारचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
टॅग्स :गायत्री दातार