Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौतमी पाटील आणि शिव ठाकरेचे फोटो व्हायरल! चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:19 IST

1 / 11
गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलंच लोकप्रिय आहे. आपल्या दिलखेचक अदा आणि अप्रतिम नृत्य कौशल्याने तिने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
2 / 11
तरुण वर्गामध्ये गौतमी पाटीलची मोठी क्रेझ पाहायला मिळते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर असतात.
3 / 11
सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेसोबत गौतमी दिसून येत आहे.
4 / 11
एका फोटोत शिवने तिला उचलूनही घेतलं आहे. दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
5 / 11
मात्र, या व्हायरल फोटोंमागची 'रिअल स्टोरी' आता समोर आली आहे. गौतमी आणि शिव यांचं लग्न खरंखरं नाही तर तो एका प्रोजेक्टचा भाग आहे.
6 / 11
हे सर्व फोटो त्यांच्या एका नवीन म्युझिक प्रोजेक्टचा भाग आहेत. शिव आणि गौतमी यांचे 'मासोळी सोन्यावाणी' हे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे हे फोटो आहेत.
7 / 11
गौतमीने शेअर केलेल्या इतर फोटोंमध्ये ती पिंक ड्रेसमध्ये समुद्रकिनारी शिवसोबत दिसत आहे.
8 / 11
शिव ठाकरे आणि गौतमी पाटील ही जोडी पहिल्यांदाच एका गाण्याच्या निमित्ताने एकत्र आली आहे.
9 / 11
युट्युबवर हे गाणे उपलब्ध असून प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडली आहे. सुरुवातीला लग्नाचे फोटो पाहून धक्का बसलेल्या चाहत्यांना आता हे गाणं पाहून हायसं वाटलं आहे.
10 / 11
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिव ठाकरेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो एका नवरीचा हात धरून उभा होता. या फोटोला त्याने 'फायनली' (Finally) असे कॅप्शन दिले होते, पण नवरीचा चेहरा लपवला होता.
11 / 11
यानंतर त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यावर त्यानं तो फोटो एका प्रोजक्टचा भाग असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण, फोटोतील तरुणीची ओळख उघड केली नव्हती. अखेर आता त्याच्यासोबतची ती तरुणी गौतमी असल्याचं स्पष्ट झालं.
टॅग्स :गौतमी पाटीलशीव ठाकरे