By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:04 IST
1 / 8सबसे कातील गौतमी पाटील... लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलची महाराष्ट्रात खूप क्रेझ आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला लोकांची तुफान गर्दी असते. 2 / 8नुकतंच गौतमीनं आपला वाढदिवस साजरा केला. सामाजिक बांधिलकी जपत तिनं मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. 3 / 8गौतमी पाटीलने आपला वाढदिवस 'श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित, निवासी मतिमंद विद्यालय' येथील मुलांसोबत साजरा केला.4 / 8गौतमी पाटीलने केवळ केक कापला नाही, तर मुलांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. गौतमीच्या या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.5 / 8गौतमीने यावेळी सुंदर ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूपच क्युट दित होती. गौतमीच्या या संवेदनशील निर्णयामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.6 / 8दरम्यान, काही दिवसांआधीही गौतमीनं एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. तिथल्या लहान मुलींनी गौतमीला प्रेमाने कडकडून मिठी मारत, त्यांना जवळ घेत मायेने विचारपूस केली होती.7 / 8सध्या गौतमीला अनेक मराठी सिनेमांमध्येही डान्स नंबर करण्याची संधी मिळत आहे. एकूणच तिचं करिअर आता सुसाट आहे. 8 / 8अलिकडेच ती गायक अभिजीत सावंतच्या 'रुपेरी वाळूत' अल्बममध्ये झळकली होती.