Join us

PHOTOS: गौहर खानने शेअर केले प्री-वेडिंगचे फोटो, फियॉन्से जैद दरबारसोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 15:56 IST

1 / 9
बिग बॉस फेम गौहर खान लवकरच स्माइल दरबारचा मुलगा जैद दरबारसोबत लग्न करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 9
मंगळवारी गौहरने आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली. गौहर खानने सांगितले की, २५ डिसेंबरला लग्न करणार आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
3 / 9
गौहरने एक छानसा फोटो पोस्ट शेअर करत सांगितले की ती जैद दरबारसोबत नवीन आयुष्याला सुरूवात करणार आहे. त्याची अनाउंसमेंट तिने खास अंदाजात केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 9
गौहरने तिच्या प्री वेडिंगचे फोटोशूटमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि सोबत तिने एक स्पेशल मेसेजही लिहिला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 9
यात लिहिले आहे की, २०२०२ वर्षे साधारण राहिले आणि आमची लव्हस्टोरी असाधारण. आम्हाला हे सांगायला आनंद होतो आहे की आम्ही लग्न करतो आहे आणि नवीन प्रवासाला सुरूवात करत आहोत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 9
कोरोना महारोगराई आणि सध्याची परिस्थिती पाहून आम्ही हा खास दिवस फक्त कुटुंबासोबत साजरा करणार आहोत. त्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य पाहिजे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 9
काही दिवसांपूर्वी गौहर खान आणि जैद दरबारने आपल्या एंगेजमेंटची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. असे सांगितले जात आहे लग्नाचे कार्यक्रम दोन दिवस असणार आहे आणि लग्न मुंबईत होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 9
कोरोनामुळे जास्त लोक लग्नात सहभागी होणार नाहीत. दोन्ही कुटुंब आणि जवळच्या लोकांमध्ये निकाह पार पडणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
9 / 9
टॅग्स :गौहर खान