Join us  

अखेर तितिक्षा तावडे झाली मिसेस बोडके! लग्नाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 3:26 PM

1 / 8
मराठी कलाविश्वात सध्या लगीनसराई पाहायला मिळत आहे. २४ फेब्रुवारी रोजी अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांनी लग्न केले. त्यानंतर आता अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनीदेखील लग्नगाठ बांधली आहे.
2 / 8
तितिक्षा आणि सिद्धार्थने २६ फेब्रुवारी रोजी कुटुंब आणि सिनेइंडस्ट्रीतील लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे.
3 / 8
सिद्धार्थ आणि तितिक्षा गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत होते आणि त्यांनी एक फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना सांगितले होते. आता अखेर ते विवाह बंधनात अडकले आहेत.
4 / 8
त्यांचा विवाहसोहळा ठाण्यात अतिशय थाटामाटात पार पडला आहे. या विवाहसोहळ्याला त्यांच्या कुटुंबीयांसोबतच सिनेविश्वातील कलाकार मंडळी उपस्थित होते.
5 / 8
लग्नात तितिक्षाने मोती रंगाची नऊवारी नेसली आहे.त्याच रंगाची शालही तिने घेतली आहे. सोबत कॉन्ट्रास्ट सोनेरी रंगाचा ब्लाउज परिधान केलं आहे.
6 / 8
तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. डोईवर मुंडावळ्या आणि चेहऱ्यावर हसू यात ते दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
7 / 8
सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
8 / 8
सोशल मीडियावर त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
टॅग्स :तितिक्षा तावडे