लय भारी दिसते 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची पत्नी, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:49 IST
1 / 9अभिनेता निलेश साबळे मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता आहे. फू बाई फूमुळे तो लोकप्रिय झाला आणि चला हवा येऊ द्या या शोमधून तो घराघरात पोहचला. 2 / 9निलेश साबळे लिखाण करतो, अभिनय आणि दिग्दर्शनही करतो. त्याने डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे. 3 / 9निलेशने आयुर्वेदाची एम एसची पदवी घेतली असली तरी त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो प्रसिद्ध होता. 4 / 9शिक्षण घेतल्यानंतर त्याने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 5 / 9निलेशला त्याच्या करिअरमध्ये त्याची पत्नी गौरी साबळेची मोलाची साथ लाभली आहे. 6 / 9गौरी साबळे देखील ग्रॅज्युएट असून तिचा सिनेइंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. निलेश आणि गौरीचा गेल्या ११ वर्षांपासून सुखी संसार सुरू आहे.7 / 9निलेशची पत्नीसुद्धा एक डॉक्टरच आहे. ती दिसायलाही सुंदर आहे.8 / 9निलेश साबळे शेवटचा 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या शोमध्ये पाहायला मिळाला. पण या कार्यक्रमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.9 / 9निलेशच्या अभिनयाचे, त्याच्या सूत्रसंचालनाचे आज अनेक फॅन आहेत.