By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 12:30 IST
1 / 10पहिला इंडियन आयडल बनत मराठमोळा अभिजीत सांवतनेही याच शोमधून विजेता बनत संगीतक्षेत्रात आपला ठसा उमटवला. या शोनंतर 'एशियन आयडॉल'मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या स्पर्धेत त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. 2 / 10इंडियन आयडॉल विजेतपद मिळवल्यानंतर 'आपका अभिजीत' नावानं त्याचा एक अल्बमही रसिकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 'जुनून' या अल्बमलाही रसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. 'आशिक बनाया आपने' या सिनेमासाठी अभिजीतनं 'मरजावा' हे गाणंही गायलं. 'मोहब्बतें लुटाऊंगा' हा अल्बम तर प्रचंड हिट ठरला होता.3 / 10इंडियन आयडॉलनंतर अभिजीत पत्नी शिल्पासोबत डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए'च्या सीझन ४ मध्येही ठुमके लागवताना दिसला, ‘लॉटरी’ या सिनेमातून त्याने अभियातही नशीब आजमवले.मात्र त्याला हवे तशे यश मिळाले नाही.4 / 10 अभिजीत सावंतनंतर आलेले स्पर्धक आज प्रचंड प्रकाशझोतात आहेत. पण अभिजीत सावंत मात्र कुठेच झळकत नाही. इतक्या मोठ्या शोचा विजेता बनल्यानंतरही तो कोणत्याही शोला जज करताना दिसत नाही. 5 / 10तो सध्या काय करतोय याविषयी जाणून घेण्याचीही चाहत्यांना उत्सुकता असते. अभिजीत सावंत सोशल मीडियावर सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. तो सध्या काय करतोय या गोष्टी चाहत्यांनाही नेहमीच पडतात. 6 / 10या शोमुळे त्याला प्रचंड लोकप्रियताही मिळाली. २००५ साली या शोमधून पहिला इंडियन आयडल ठरलेला अभिजीत सावंतची जादू मात्र काळानुसार कमी होती गेली. आज त्याची कुठेच चर्चाही होत नाही.7 / 10अभिजीत आणि शिल्पा या दाम्पत्याला आहना नावाची एक मुलगी आहे.सोशल मीडियावर कुटंबासह तो क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो.सोशल मीडियावरही त्याच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड आहे.8 / 10 त्याला इंडस्ट्रीत हवे तसे यश मिळाले नाही. यावर त्याने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, आपली इंडस्ट्री टॅलेंटवर कमी आणि ओळखींवर जास्त काम करते. बहुतांश संगीतकार आपल्या ओळखीच्या गायकांनाच संधी देतात. 9 / 10 गेल्या 15 वर्षांच्या काळात अनेकांनी मला रिजेक्ट केलं. कारण मी त्यांच्या गटातील गायक नव्हतो. रिअलिटी शोमधील कलाकार रातोरात प्रसिद्ध होतात, त्यांचा खुप मोठा फॅन फॉलोअर्स असतो. मात्र त्यांच्यासोबत काम करायला इंडस्ट्रीमधील कलाकार कंफर्टेबल नसतात.हेच खरं वास्तव असल्याचे अभिजीतने सांगितले होते.10 / 10अभिजीत सावंत देश-विदेशामध्ये गाण्यांचे कॉन्सर्ट करत असतो .कुठल्याच सिनेमांमध्ये त्याला पाहिजे तशी गाण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळं त्यानं सिनेमांचा नाद सोडून आता लाईव्ह शोवर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे.