By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:08 IST
1 / 7'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या १६ वर्षांपासून टेलिव्हिजनवर राज्य करत आहे. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.2 / 7मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जवळचं आहे. त्यातलीच एक दयाबेन. अभिनेत्री दिशा वकानीने दयाबेनची भूमिका साकारली जिला कमालीचं प्रेम मिळालं.3 / 7दयाबेनची स्टाईलच अजब होती. तिची बोलण्याची पद्धत, गरबा खेळण्याची स्टाईल, तिचा आवाज एकंदर सगळ्यावरच प्रेक्षक खळखळून हसायचे.4 / 7दिशा वकानीने मालिका सोडून आता ७ वर्ष उलटून गेले आहेत. दोन मुलांच्या पालनपोषणातच ती व्यग्र आहे. २०१७ साली तिला पहिली मुलगी झाली. तर २०२२ साली तिने मुलाला जन्म दिला.5 / 7आता नुकतंच दिशा वकानीच्या लेटेस्ट फोटोवरुन तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तिचा लूक अगदीच बदललेला दिसत आहे. 6 / 7निळ्या रंगाची प्रिंटेड कुर्ती आणि त्यावर तिने क्रीम रंगाची ओढणी घेतली आहे. डोळ्यावर मोठा चष्या आहे. दिशा एखाद्या बागेत आलेली दिसत आहे आणि कॅमेऱ्यासमोर हसत उभी आहे.7 / 7सर्वांना हसवणारी दिशा बऱ्याच वर्षांपासून आता घर-संसारातच व्यग्र झाली आहे. तिचे चाहते मात्र तिची अजूनही मालिकेत आठवण काढत आहेत आणि तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत.