Join us  

आई बनल्यानंतर ‘संध्या बिंदिणी’ला मिळत नाही काम, सोशल मीडियाचा घ्यावा लागतोय आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 7:04 PM

1 / 12
अल्पावधीतच 'दिया और बाती हम' या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.
2 / 12
या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती.
3 / 12
रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली होती.
4 / 12
दीपिका सिंह सध्या काय करतेय असा प्रश्न पडणा-यांसाठी त्याचे उत्तर सोशल मीडियावर नजर टाकल्यास मिळेल.
5 / 12
सध्या दीपिका सिंहकडे कोणतेच काम नाही, मुलाच्या जन्मानंतर तिने थोड्यावेळासाठी ब्रेक घेतला होता.
6 / 12
आता मुलगाही मोठा झालाय त्यामुळे दीपिकाला पुन्हा तिचे काम सुरु करायचे आहे.
7 / 12
कामाच्या शोधात असलेल्या दीपिकाला आता काम मिळत नाहीय. सध्या ती कामाच्या शोधात आहे.
8 / 12
दीपिका सोशल मीडियावर लक्ष वेधून घेण्यासाठी तिचे फनी व्हिडीओ शेअर करताना दिसते.
9 / 12
तर कधी रस्त्यावरही डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.
10 / 12
ती सध्या वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतंय.
11 / 12
डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी ती वर्कआऊट,डायटींग अशा गोष्टी करताना दिसतेय.
12 / 12
आता ती अधिक स्टायलिश बनली आहे.