आई बनल्यानंतर ‘संध्या बिंदिणी’ला मिळत नाही काम, सोशल मीडियाचा घ्यावा लागतोय आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 19:11 IST
1 / 12 अल्पावधीतच 'दिया और बाती हम' या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.2 / 12या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. 3 / 12 रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली होती.4 / 12 दीपिका सिंह सध्या काय करतेय असा प्रश्न पडणा-यांसाठी त्याचे उत्तर सोशल मीडियावर नजर टाकल्यास मिळेल.5 / 12सध्या दीपिका सिंहकडे कोणतेच काम नाही, मुलाच्या जन्मानंतर तिने थोड्यावेळासाठी ब्रेक घेतला होता.6 / 12 आता मुलगाही मोठा झालाय त्यामुळे दीपिकाला पुन्हा तिचे काम सुरु करायचे आहे.7 / 12कामाच्या शोधात असलेल्या दीपिकाला आता काम मिळत नाहीय. सध्या ती कामाच्या शोधात आहे.8 / 12दीपिका सोशल मीडियावर लक्ष वेधून घेण्यासाठी तिचे फनी व्हिडीओ शेअर करताना दिसते.9 / 12 तर कधी रस्त्यावरही डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.10 / 12 ती सध्या वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतंय. 11 / 12 डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी ती वर्कआऊट,डायटींग अशा गोष्टी करताना दिसतेय.12 / 12आता ती अधिक स्टायलिश बनली आहे.