एअर हॉस्टेस व्हायचं म्हणून मुंबईत आली अन् बनली टेलिव्हिजनची क्वीन, एका ऑडिशनने बदललं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 11:31 IST
1 / 9हिना खान ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हिना आज आपला 36वा वाढदिवस साजरा करतेय.2 / 9जम्मू-काश्मीरमध्यल्या श्रीनगरमध्ये जन्मलेली हिना सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. 3 / 9हिना शिक्षणसाठी श्रीनगरहुन दिल्लीत आली. तिने 2009मध्ये हिनाने गुरुग्राममधून एमबीए केले.4 / 9हिनाला एअरहोस्टेस व्हायचे होते म्हणून ती मुंबईत आली. मुंबई येऊन हिनाने एअर होस्टेसचा कोर्स ज्वॉईन देखील केला पण नशिबाने तिला साथ नाही दिली. या कोर्सच्या दरम्यान तिला मलेरिया झाला आणि ती ट्रेनिंग अॅकडमी ज्वॉईन नाही करु शकली. 5 / 9एकदिवस हिना मैत्रिणीला भेटायला 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या सेटवर गेली. जिथं ऑडिशन्स सुरु होते. हिनाने कधी विचारदेखील केला नव्हता की तिला अभिनेत्री व्हायचं आहे.6 / 9यानंतर हिनाला निर्मात्यांचा फोन आला आणि तिची मुख्य भूमिकेसाठी निवड झाल्याचं सांगतलं. यानंतर मात्र हिनाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 7 / 9हिना 'ये रिश्ता क्या कहलाता' मालिकेतून ‘अक्षरा बहु’ म्हणून घराघरात पोहोचली. तिला या मालिकेमुळे खूप प्रसिद्ध मिळाली. 8 / 9याच मालिकेच्या सेटवर हिनाला आपला जोडीदार मिळाला. 'ये रिश्ता क्या कहलाता है'चा सुपरवाइजिंग प्रड्यूसर रॉकी जयसवालला ती 2014 पासून डेट करतेय.9 / 9हिना २०१७ मध्ये रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' हा शोमध्ये सहभागी झाली होती. यानंतर बिग बॉसच्या ११ व्या सीझनमध्ये सहभागी होत हिनाने घरात खूप हंगामा केला होता.