‘ही’ आहे ‘बिग बॉस ओटीटी’ची सर्वाधिक महागडी स्पर्धक, जाणून घ्या कोणी किती घेतलं मानधन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 17:55 IST
1 / 14‘बिग बॉस’च्या घरात राहणं सोप्पं नाही म्हणतात. पण याचसाठी दाम मिळतात... सर्व कलाकार तगडे मानधन घेतात. 2 / 14शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील सर्वात चर्चित चेहरा आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मधील एका आठवड्यासाठी ती 3 लाख 75 हजार इतकं मानधन घेत असल्याचे कळतेय.3 / 14बहू हमारी रजनी कांत या मालिकेमुळे फेमस झालेली अभिनेत्री रिद्धिमा पंडित ही ‘बिग बॉस ओटीटी’ची सर्वात महागडी स्पर्धक आहे, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. एका आठवड्यासाठी ती 5 लाख रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे.4 / 14 गायिका नेहा भसीन ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात चांगलीच गाजतेय. एका आठवड्यासाठी ती 2 लाख रुपये इतके मानधन घेत असल्याची चर्चा आहे.5 / 14कुमकुम भाग्य या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला जीशान खान एका आठवड्यासाठी 2 लाख 50 हजार इतके मानधन घेत असल्याचं कळतंय.6 / 14अनेक रिअॅलिटी कार्यक्रमात दिसलेली दिव्या अग्रवालला प्रत्येक आठवड्यासाठी 2 लाख रुपये मानधन दिल्याची चर्चा आहे.7 / 14अभिनेता राकेश बापट हा सुद्धा ‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. एका आठवड्याचं त्याचं मानधन 1 लाख 20 हजार रूपये असल्याचं कळतंय.8 / 14भोजपुरी स्टार अक्षरा सिंह प्रत्येक आठवड्यासाठी 1 लाख 70 हजार रुपये मानधन घेत आहे.9 / 14अभिनेता करण नाथ याने एका आठवड्यासाठी 1 लाख 75 हजार रुपये इतके मानधन घेतले आहे.10 / 14 पंजाबी गायक मिलिंद गाबा देखील बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. मिलिंद या शोसाठी एका आठवड्याला 1 लाख 75 हजार रुपये मानधन घेत असल्याचे कळतेय.11 / 14सोशल मीडियावरील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाणारी मुस्कान जट्टाना एका आठवड्यासाठी 1 लाख 75 हजार इतके मानधन घेत असल्याचे कळतेय.12 / 14प्रसिद्ध कोरिओग्राफर निशांत भट्ट याला या शोसाठी एका आठवड्याला 1 लाख 20 हजार इतके मानधन मिळतेय.13 / 14‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रतिक सेहजपाल. हा प्रतिक एका आठवड्यासाठी 1 लाख रुपये मानधन घेत आहे.14 / 14 पहिल्याच आठवड्यात घरातून बाद झालेली उर्फी जावेद हिला एका आठवड्यासाठी 2 लाख 75 हजार रुपये इतक्या मानधनावर साईन करण्यात आलं होतं असं कळतं.