By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 21:09 IST
1 / 6बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा (Bigg Boss Marathi Season 5) आज ग्रँड फिनाले पार पडला. ७० दिवस चाललेल्या या शोमध्ये सर्वांनीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 2 / 6बारामतीच्या छोट्या गावातील सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी नावावर करत इतिहास रचला. इंडियन आयडॉल विजेता अभिजीत सावंत रनर अप ठरला. रितेश देशमुखने सूरजला ट्रॉफी देत त्याला या पर्वाचा विजेता घोषित केलं.3 / 6बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वाबद्दल सांगायचे तर चौथ्या पर्वात अभिनेता अक्षय केळकर विजेता झाला होता. अक्षयने घरात त्याच्या साध्या वागण्याने सर्वांचेच मन जिंकले होते. 4 / 6तिसऱ्या पर्वात विशाल निकम 'बिग बॉस' चा विजेता झाला होता. या पर्वात तर विशालच्या प्रेमप्रकरणाचीच चर्चा जास्त रंगली होती.5 / 6बिग बॉस २ चा विजेता होता सर्वांचा लाडका शिव ठाकरे. त्याचा गेम असो, त्याचं साधं वागणं असो किंवा हवा तिथे राग दाखवणं असो हे सर्वच प्रेक्षकांना भावलं होतं. तसंच त्याचे आणि वीणा जगतापचे प्रेमप्रकरणही गाजले होते.6 / 6बिग बॉस मराठी हा शो पहिल्यांदा सुरु झाला तो २०१८ मध्ये. या पर्वाची विजेती ठरली होती मेघा धाडे. जिला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता. तिच्यामुळे पहिला सिझन चांगलाच गाजला होता.