Join us
Daily Top 2Weekly Top 5

तन्वी बोलते सबको कोलते! 'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारी, सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवणारी ही आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:36 IST

1 / 9
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी ६च्या पहिल्याच आठवड्यात घरात जोरदार वाद होताना दिसत आहेत. तन्वी कोलते हिने टास्कदरम्यान सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवलं.
2 / 9
'तुला वाटतं तू कॉमेडी करतो?' असं तन्वीने म्हटल्यानंतर सागरचाही पारा चढला. याआधीही तन्वीने सागरला अरे तुरे करत त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता.
3 / 9
बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच तन्वीने अख्खं घर डोक्यावर घेतलं आहे. पहिल्याच दिवशी ती रुचितासोबत भांडली होती. नंतर दिपाली सय्यदसोबत तिचं वाजलं.
4 / 9
कायम मोठ्या आवाजात बोलणारी आणि तलवार काढून भांडणासाठी तयार असलेल्या तन्वीला ट्रोल केलं जात आहे.
5 / 9
पण बिग बॉस मराठीच्या घरात राडा करणारी ही तन्वी कोलते नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.
6 / 9
तन्वी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. २७ वर्षांच्या तन्वीने मिस गोवा २०२० आणि मिस रत्नागिरी २०१८ हे खिताब जिंकले आहेत.
7 / 9
झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
8 / 9
तन्वी सोशल मीडियावर सक्रिय असून ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवताना दिसते. तिचे इन्स्टाग्रामवर ८५.९ हजार फॉलोवर्स आहेत.
9 / 9
सागर कारंडेला त्याच्या कॉमेडीवरुन हिणवल्याने तन्वी सध्या ट्रोल होत आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश तन्वीला खडे बोल सुनावणार का हे पाहावं लागेल.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार