Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीच्या बहिणीसोबत होतं राकेश बापटचं अफेअर, लग्नही करणार होते पण...; नेमकं काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:20 IST

1 / 8
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'मुळे राकेश बापट सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात राकेश त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलताना दिसला.
2 / 8
एक्स पत्नीनंतर बिग बॉसच्या घरात राकेश बापटच्या अफेअरची चर्चाही रंगली होती. बिग बॉस मराठी आधी राकेश बापट बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाला होता.
3 / 8
बिग बॉस ओटीटीमध्ये राकेश बापट आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी यांचे सूर जुळले होते.
4 / 8
शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या अफेअरची प्रचंड चर्चा रंगली होती. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही ते रिलेशनशिपमध्ये होते.
5 / 8
बिग बॉसच्या घरात राकेश आणि शमिताची चांगली केमिस्ट्रीही दिसत होती. प्रेक्षकांनाही ही जोडी पसंती पडली होती.
6 / 8
बिग बॉसच्या घरात ऑनस्क्रीन राकेशने शमिताला किसही केलं होतं. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
7 / 8
राकेश बापट आणि शमिता एकमेकांसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. एकमेकांच्या कुटुंबीयांनाही ते पसंत होते.
8 / 8
पण, बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचं ब्रेकअप झालं. त्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६राकेश बापटटिव्ही कलाकार