Join us
Daily Top 2Weekly Top 5

"फोटो काढला नाही म्हणून त्याने माझ्यासमोर त्याचा हात कापून घेतला...", राधा पाटीलने सांगितला चाहत्याचा भयानक किस्सा

By कोमल खांबे | Updated: January 21, 2026 12:26 IST

1 / 8
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'मध्ये प्रेक्षकांची लाडकी कातिलों की कातिल राधा पाटील सहभागी झाली आहे. राधाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.
2 / 8
राधाच्या शोला चाहते प्रचंड गर्दी करतात. अशाच एका चाहत्याचा भयानक किस्सा राधाने गप्पा कट्टा या पॉडकास्टमध्ये सांगितला होता.
3 / 8
फोटो दिला नाही म्हणून त्या चाहत्याने राधासमोर हातच कापून घेतला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर राधा प्रचंड घाबरली होती.
4 / 8
चाहत्याचा हा किस्सा सांगताना राधा म्हणाली, 'पुण्याला माझा शो होता आणि तिथे एका चाहत्याने मी फोटो दिला नाही म्हणून हात कापून घेतला होता.
5 / 8
'खरं तर तिथे खूप गर्दी होती. त्यामुळे मला त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं आणि गर्दीमुळे त्यालाही माझ्यापर्यंत येता येत नव्हतं'.
6 / 8
'त्याने मला व्हॅनिटीमधून हात दाखवला. त्याच्या हातात चावी का काहीतरी होती. त्यानेच त्या चाहत्याने हातावर संपूर्ण कट मारले. ते पाहून मला खूप भीती वाटायला लागली होती'.
7 / 8
'ते पाहून मी बाउन्सरला सांगितलं की त्याने हात कापून घेतलाय. मला त्याचं रक्त दिसतंय. मग त्याला बाजूला घेऊन आम्ही पट्टी वगैरे लावली'.
8 / 8
'त्याला आम्ही समजावलं की असं नको करूस. त्यानंतर मग मी त्याला फोटो दिला. त्याने त्याच्या रक्ताने माझं पेटिंग काढून आणलं होतं. ते मी आजही माझ्या घरात लावलं आहे'.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार