By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:54 IST
1 / 8Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'मुळे सागर कारंडे चर्चेत आला आहे. पहिल्या दिवसापासूनच सागर कारंडे घरातील मुद्दे उचलून धर योग्य ते मत मांडताना दिसत आहे. 2 / 8याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरातून सागर त्याच्या कॉमेडीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजनही करताना दिसत आहे. 3 / 8सागर कारंडे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. कॉमेडीने त्याने प्रेक्षकांच्या मनात त्याचं स्थान निर्माण केलं. 4 / 8'चला हवा येऊ द्या' या शोमुळे सागरला प्रसिद्धी मिळाली. सागर कारंडेने या शोमध्ये साकारलेली स्त्री पात्र प्रचंड गाजली. 5 / 8कलाविश्वात नाव कमावणं सागरसाठी इतकं सोपं नव्हतं. पण, त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याची पत्नी त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती. 6 / 8सागरच्या पत्नीचं नाव सोनाली कारंडे असं आहे. सोनाली कलाविश्वापासून दूर असते. 7 / 8नवरा सुपरस्टार असूनही कोणताही गर्व त्यांना नाही. त्यांचं राहणीमानही अत्यंत साधं आहे. 8 / 8सागर अनेकदा त्याच्या पत्नी आणि कुटुंबीयांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्याला एक मुलगीही आहे.