Join us
Daily Top 2Weekly Top 5

BBM 6: ८०० खिडक्या अन् ९०० दारं; 'बिग बॉस मराठी ६'चं चकवा देणारं घर, पाहा Inside फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 10:13 IST

1 / 12
'बिग बॉस मराठी ६' हे पर्व आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाची थीमही फारच खास आहे.
2 / 12
'बिग बॉस मराठी ६'च्या घरात यंदा ८०० खिडक्या अन् ९०० दारं ही थीम करण्यात आली आहे. घरात सगळीकडे दार अन् खिडक्या दिसत आहेत.
3 / 12
यंदाच्या पर्वातही घरात मोठा प्रशस्त हॉल आहे. जिथे वीकेंड का वारसाठी स्पर्धक बसलेले दिसतात.
4 / 12
घरातील किचनही आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलं आहे.
5 / 12
तर स्पर्धकांना बसण्यासाठी, जेवणासाठी खास डायनिंग एरियादेखील देण्यात आला आहे.
6 / 12
'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील बेडरुममध्ये खास थीम केल्याचं दिसत आहे.
7 / 12
तर यंदाच्या घरातही कॅप्टनसाठी वेगळी रुम असणार आहे. कॅप्टनसाठीची रुम खास पद्धतीने सजविण्यात आली आहे.
8 / 12
यंदाही घरात प्रशस्त गार्डन एरिया आहे. जिथे 'बिग बॉस मराठी'चे टास्क खेळले जातात.
9 / 12
जिथे घरातील सामान 'बिग बॉस'कडून दिलं जातं ती स्टोअर रुमही घरात आहे.
10 / 12
'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील कन्फेशन रुम जिथे बिग बॉस स्पर्धकांना काही खास गोष्टी सांगतात.
11 / 12
'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील यंदाचं बाथरुमही खास आहे.
12 / 12
'बिग बॉस मराठी ६'चं यंदाचं घर हे प्रेक्षकांना चकवा देणारं आहे. त्यामुळे आता घरात गेल्यानंतर स्पर्धकांची तारांबळ उडाल्याचं दिसणार आहे.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार