Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी

By देवेंद्र जाधव | Updated: January 11, 2026 23:16 IST

1 / 13
सोशल मीडिया स्टार आणि सोनावणे वहिनींच्या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया स्टार करण सोनावणेने 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात झकास एन्ट्री केली आहे.
2 / 13
झी मराठीवरीलल ३६ गुणी जोडी मालिकेतील आयुष संजीव आणि झी मराठीवरीलच लक्ष्मी निवास मालिकेतील अभिनेत्री तन्वी कोलतेने 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेतली
3 / 13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन दिवा असलेली सोनाली राऊतने एन्ट्री घेतली. सोनाली आणि रितेशने ग्रेट ग्रँड मस्ती सिनेमात काम केलंय
4 / 13
खानदेशचा सुपुत्र सचिन कुमावतची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री झाली आहे. सचिनने अहिराणी बोलून सर्वांना थक्क केलं.
5 / 13
चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन सागर कारंडेने 'बिग बॉस मराठी ६'मध्ये एन्ट्री घेतली. सागरच्या एन्ट्रीने शोमध्ये विनोदाचा तडका लागणार आहे.
6 / 13
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री दिपाली सय्यदने 'बिग बॉस मराठी ६'मध्ये एन्ट्री घेतली. दिपाली ही 'बिग बॉस मराठी ६'मध्ये एन्ट्री घेणारी पहिली अभिनेत्री ठरली
7 / 13
नवरी मिळे नवऱ्याला मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता राकेश बापट 'बिग बॉस मराठी ६'मध्ये दाखल झाला आहे. राकेशने बिग बॉस हिंदीचं ओटीटी पर्वही गाजवलं आहे
8 / 13
सोशल मीडिया स्टार अनुश्री माने आणि रोडीज मध्ये झळकलेली मॉडेल रुचिता जामदार 'बिग बॉस मराठी ६'मध्ये आली आहे. दोघींमध्ये तू तू मै मै बघायला मिळाली
9 / 13
इंडियन आयडॉल फेम गायिका प्राजक्ता शुक्रे 'बिग बॉस मराठी ६'मध्ये आली आहे. प्राजक्ता आणि अभिजीत सावंत इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वात सहभागी होते.
10 / 13
राजकारणात सक्रीय असलेली आणि विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवणारी दिव्या शिंदे याशिवाय मेहनत करुन कुटुंबाचं पोट भरणारा अमरावतीचा बॉडी बिल्डर रोशन भजनकर बिग बॉस मराठी ६ मध्ये आले आहेत.
11 / 13
दगडी चाळीत राहणारा विशाल कोटियन आणि हेअरस्टायलिस्ट ओमकार राऊत यांची बिग बॉस मराठी ६ मध्ये एन्ट्री झाली आहे. रितेशने दोघांच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं.
12 / 13
सबसे कातील राधा पाटील 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आली आहे. राधाने आल्या आल्याच गौतमी पाटीलला खुलं आव्हान दिलं आहे.
13 / 13
जालन्याचा डॉन प्रभु शेळकेची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री केली आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी ऐकून रितेशही भावुक झाला.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६रितेश देशमुखकलर्स मराठीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन