Bigg Boss Marathi 6: कातिलों की कातिल राधा पाटील ते सोनावणे वहिनी; 'बिग बॉस मराठी ६'मधल्या कन्फर्म स्पर्धकांची लिस्ट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:00 IST
1 / 10Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६' हे नवं पर्व ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 2 / 10'बिग बॉस मराठी ६'मधील काही स्पर्धकांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 3 / 10दिपाली सय्यद : अभिनयानंतर राजकारणात गेलेल्या दिपाली सय्यद यंदा 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दिसणार आहेत. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये त्यांची झलक चाहत्यांना दिसली आहे.4 / 10राकेश बापट : हिंदी बिग बॉस गाजवलेला राकेश बापट आता 'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार आहे. राकेश बापटची एन्ट्री कन्फर्म झाली आहे. 5 / 10करण सोनावणे : प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दिसणार आहे. त्याचा प्रोमोही समोर आला आहे.6 / 10अनुश्री माने : करण सोनावणेसोबत इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेदेखील 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दिसण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.7 / 10श्रेयस तळपदे : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. 8 / 10सोनाली राऊत : अभिनेत्री आणि मॉडेल सोनाली राऊतही 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेणार आहे. पहिल्याच प्रोमोमध्ये चाहत्यांना तिची झलक दिसली आहे. 9 / 10राधा पाटील मुंबईकर : लावणी डान्सर राधा पाटील मुंबईकरही 'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार आहे. राधा पाटीलचं नाव कन्फर्म करण्यात आलं आहे. 10 / 10आयुष संजीव : अभिनेता आयुष संजीवही 'बिग बॉस मराठी ६'चा कन्फर्म स्पर्धक आहे. आयुषचं नावही प्रचंड चर्चेत आहे.