Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी रिलेशनशिप, बॉयफ्रेंडसोबत लग्नही करणार होती पण...; ब्रेकअपमुळे चर्चेत आलेली अनुश्री माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:25 IST

1 / 9
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'पर्वाचा दुसरा आठवडा सुरू आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच राकेश बापटसोबत भांडण झाल्यामुळे अनुश्री माने चर्चेत आली आहे.
2 / 9
बेडवरून उठवण्यावरुन राकेश आणि अनुश्रीमध्ये वादाची ठिणगी पडली. राकेशच्या बेडवर अनुश्री झोपली होती. खूप विनवण्या करूनही अनुश्री उठली नाही. त्यामुळे राकेशने तिचा हात पकडत तिला उठवलं.
3 / 9
यावरुन अनुश्री चिडली आणि तिने राकेशवर गंभीर आरोपही केले. त्यामुळे राकेशचा पाराही चढल्याचं दिसलं.
4 / 9
अनुश्री ही एक सोशल मीडिया स्टार आहे. रील बनवून तिने प्रसिद्धी मिळवली आहे.
5 / 9
इन्स्टाग्रामवर अनुश्रीचे १.६ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. चाहते तिच्या फोटोंवर अक्षरश: लाइक्सचा पाऊस पडतात.
6 / 9
अनेक अल्बम साँगमध्येही अनुश्री दिसली आहे. तर चल भावा सिटीत या रिएलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.
7 / 9
अनुश्री अनेक कारणांमुळे चर्चेत आली होती. यातीलच एक म्हणजे तिची ब्रेकअप स्टोरी... प्रसिद्धी मिळवल्यानंतर अनुश्री तिच्या मावस बहिणीच्या दीरासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
8 / 9
त्या दोघांनी एकत्र व्हिडीओही केले होते. अनुश्रीने स्वत:च्याच युट्यूबवरुन व्हिडीओ शेअर करत बॉयफ्रेंडची ओळख करून दिली होती.
9 / 9
ते दोघं लग्नही करणार होते. मात्र काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार