By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:19 IST
1 / 7'बिग बॉस मराठी'चे सहावे पर्व सध्या रंजक वळणावर आहे. सहा आठवड्यांचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर आता सातव्या आठवड्यात घरातील समीकरणं बदलताना दिसत आहेत.2 / 7आतापर्यंत सोनाली राऊत, ओंकार राऊत, करण सोनावणे, आयुष संजीव आणि सचिन कुमावत या सदस्यांना घराचा निरोप घ्यावा लागला आहे.3 / 7पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेल्या राखी सावंतने घरात पाऊल ठेवल्यापासून मनोरंजनाचा धुमाकूळ घातला. दरम्यान आता आणखी एका नवीन सदस्याच्या एन्ट्रीची चर्चा रंगली आहे.4 / 7राखीच्या एन्ट्रीनंतर आता 'बिग बॉस मराठी ६'मध्ये दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. 'टेलीचक्कर' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री रेवा कौरसे लवकरच या शोमध्ये सहभागी होऊ शकते.5 / 7रेवा कौरसे ही 'दीवानियत','प्या का पहला अध्याय:शिव शक्ती' या शोजमध्ये दिसली होती. ग्लॅमरस अभिनेत्री अशी प्रतिमा आहे. आता ती बिग बॉसमध्ये नशीब आजमावणार आहे.6 / 7रेवचा जन्म नागपूरमध्ये झाला. २०२१ साली रेवा 'सीता मनोहर श्री राघवा' या तेलुगू सिनेमात दिसली होती. यानंतर तिने दोन मालिका केल्या.7 / 7पुढील भाऊच्या धक्क्यानंतर तिची घरात एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. मात्र कलर्स मराठी वाहिनी किंवा बिग बॉसच्या टीमने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.