By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 16:04 IST
1 / 10सध्या मराठी मनोरंजनविश्वास सनई चौघडे वाजत आहेत. 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा २९ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकला.2 / 10 सूरजने पुण्याजवळील सासवडमध्ये मोठ्या थाटामाटात संजना गोफणेशी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.3 / 10सूरज आणि संजना यांचं एक खास राजेशाही फोटोशूट चर्चेत आलं आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.4 / 10सूरजने या फोटोशूटमध्ये पारंपरिक राजेशाही वेशभूषा केली. तर संजनाने मराठमोळ्या पण राजेशाही अत्यंत देखणा असा लूक केला आहे. 5 / 10संजनाने हिरव्या नऊवारी साडीतील लूकवर सुंदर पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.6 / 10सूरजने हे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये संजनासाठी प्रेमाने 'कारभारीन' असं लिहलं.7 / 10सूरजची पत्नी संजना ही त्याच्या नात्यातलीच आहे. ती सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. 8 / 10गेल्या काही वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखतात. त्याचं लव्ह मॅरेज आहे. आता ती सूरजची बायको म्हणून ओळखी जाणार आहे.9 / 10लग्नानंतर सूरज बायकोसोबत जेजुरी येथे खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. बायकोला खांद्यावर उचलून तो जेजुरी गड चढला.10 / 10सूरज आणि संजना यांच्यावर सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.