By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:36 IST
1 / 8'बिग बॉस मराठी' फेम आणि रीलस्टार सूरज चव्हाणच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 2 / 8सूरजची पत्नी संजनाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रेग्नंट असल्याचं दिसत आहे. 3 / 8संजनाच्या पत्नीने या फोटोंमध्ये बेबी शॉवरसारखा लूकही केल्याचं पाहायला मिळत आहे. साडी नेसून तिने फुलांची ज्वेलरी घातली आहे. 4 / 8यातील एका फोटोमध्ये तिच्या साडीवर 'आई' असं लिहिलेला ब्रॉचही लावल्याचं पाहायला मिळत आहे. 5 / 8संजनाने फोटोंमध्ये बेबी बंपही फ्लॉन्ट केला आहे. तिचे हे फोटो पाहून ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 6 / 8संजनाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सूरज-संजना आईबाबा होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 7 / 8मात्र अद्याप सूरजने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय कोणती पोस्टही केलेली दिसत नाही. 8 / 8सूरज आणि संजनाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न केलं. मोठ्या धुमधडाक्यात त्याचं लग्न पार पडलं होतं. आता लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांतच ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.