Bigg Boss: अश्लीलतेचा कळस! किसिंग सीनपासून चादर शेअर करेपर्यंत स्पर्धकांनी पार केल्या मर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 12:06 IST
1 / 8छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. आतापर्यंत या शोचे १४ सीजन पार पडले असून अलिकडेच १५ व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. परंतु, या प्रत्येक पर्वातील वादाबरोबरच घरातील काही सदस्यांची प्रेम प्रकरणंही गाजली आहेत. मात्र, अनेक सदस्य प्रमाणापेक्षा जास्त जवळीक साधत असल्यामुळे नेटकऱ्यांनी या शोवर अश्लीलता पसरविण्याचे आरोप केले आहेत. म्हणूनच, आतापर्यंत या शोमधील कोणते स्पर्धक प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आले ते पाहुयात.2 / 8इशान सहगल - मायशा अय्यर - मायशा आणि इशान ही जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या दोघांनी बिग बॉसच्या १५ व्या पर्वामध्ये सहभाग घेतला असून ते सातत्याने चर्चेत येत आहेत. अलिकडेच या दोघांचा किसिंग सीन व्हायरल झाला होता. हा सीन पाहिल्यानंतर अनेकांनी शोवर अश्लीलता पसरवण्याचे आरोप केले आहेत.3 / 8वीणा मलिक आणि अश्मित पटेल - बिग बॉसमधील सर्वात जास्त चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे वीणा आणि अश्मित. बऱ्याचवेळा यांना घरात एकमेकांसोबत क्लोज होतांना किंवा रोमॅण्टिक मूडमध्ये असल्याचं पाहायला मिळालं.4 / 8पुनीष शर्मा आणि बंदगी कालरा - पुनीत आणि बंदगी यांना प्रेक्षकांकडून फारशी लोकप्रियता जरी मिळाली नसली तरीदेखील ते त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आले. अनेकदा यांना घरातील लाईट्स बंद असताना किंवा घरातील अन्य जागेवर एकमेकांना किस करताना पकडण्यात आलं होतं.5 / 8अरमान कोहली आणि तनीषा मुखर्जी - अरमान कोहली आणि तनीषा मुखर्जी यांच्या नात्याची प्रचंड चर्चा रंगली. विशेष म्हणजे तनीषाच्या आईला म्हणजेच अभिनेत्री तनुजा यांना हे नातं अजिबात मान्य नसल्याचं सांगण्यात येतं. या दोघांचेदेखील अनेक किसिंग सीन व्हायरल झाले आहेत.6 / 8राहुल महाजन आणि पायल रोहतगी - पायल आणि राहुल महाजन यांचा बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूलमधील झालेला सीन पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या दोघांना प्रचंड ट्रोल केलं होतं. या दोघांनीही स्विमिंग पूलमध्ये सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार केल्याचं म्हटलं जातं.7 / 8गौतम गुलाटी आणि डायेंड्रा सोरेस - सध्या गौतम आणि डायेंड्रा यांची प्रचंड चर्चा रंगली आहे. हे दोघंही एकाच वेळी बाथरुममध्ये गेल्यामुळे नेटकऱ्यांनी या शोवर अश्लीलतेचे आरोप केले आहेत. 8 / 8करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. बिग बॉसपासूनच त्यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. एकेकाळी विभक्त झालेली ही जोडी बिग बॉसमुळे पुन्हा जवळ आली.