Bigg Boss 19: गडगंज श्रीमंत आहे मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे, टॉप ९ स्पर्धकांच्या संपत्तीचा आकडा समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:53 IST
1 / 10Bigg Boss 19: कॉमेडियन प्रणित मोरेने बिग बॉस १९च्या टॉप ९मध्ये स्थान मिळवलं आहे. बिग बॉसच्या घरातील या टॉप ९ सदस्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. 2 / 10तर क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालती चहरची एकूण संपत्ती ही २-३ कोटींच्या घरात आहे. मालती एर अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिकासुद्धा आहे. 3 / 10तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अनेक बिजनेस चालवणारी तान्या मित्तल ही १२-१५ कोटींची मालकीण आहे. 4 / 10बॉलिवूड अभिनेत्री कुनिका सदानंदची नेटवर्थ जवळपास ८-१०कोटी इतकी आहे. 5 / 10टीव्ही अभिनत्री अश्नूर कौर ४-५ कोटींची मालकीण आहे. अश्नूर अवघ्या २१ वर्षांची आहे. तिने बालपणापासूनच काम करायला सुरुवात केली होती. 6 / 10बॉलिवूड अभिनेत्री फरहाना भट्ट १.५ ते ३ कोटींची मालकीण आहे. काही सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 7 / 10हिंदी टेलिव्हिजनचा सुपरस्टार असलेला गौरव खन्ना हा १५-१८ कोटींचा मालक आहे. 8 / 10घरातील टॉप ९ पैकी अमाल मलिक सगळ्यात जास्त श्रीमंत आहे. त्याची नेटवर्थ ही २५-३० कोटी इतकी आहे. 9 / 10शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशादेखील ७-१० कोटींचा मालक आहे. 10 / 10मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरेही श्रीमंत आहे. प्रणित अंदाजे ४ ते ८ कोटींचा मालक आहे. कॉमेडी शो, कंटेट क्रिएशन आणि ब्रँड अँडोरेसमेन्टमधून प्रणित ही कमाई करतो.