सौंदर्यात मोठ्या अभिनेत्रींना टक्कर! कोण आहे 'बिग बॉस १९' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:42 IST
1 / 10अभिनेता गौरव खन्ना सध्या 'बिग बॉस १९' मुळे घराघरात चर्चेत आहे. घरात तो जसा आपल्या खेळाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय, तसंच आता त्याची पत्नी आकांक्षा हीदेखील लाईमलाईटमध्ये आली आहे.2 / 10'बिग बॉस'च्या फॅमिली वीकमध्ये आकांक्षा नुकतीच घरात आली आणि तिची सुंदरता पाहून चाहते अक्षरशः भारावून गेले आहेत.3 / 10आकांक्षा आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत. 4 / 10गौरवप्रमाणेच आकांक्षा देखील टेलिव्हिजन जगात काम करते. तिने २०१५ मध्ये 'स्वरागिनी' या टीव्ही मालिकेने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. या शोमध्ये तिने 'परिणीता'ची भूमिका साकारली होती.5 / 10मुंबईची रहिवासी असलेल्या आकांक्षाने 'भूतू' आणि 'रिवाइंड वाला लव्ह' सारख्या टीव्ही शोमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.6 / 10आकांक्षा तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. ती सोशल मीडियावर नियमितपणे स्वतःचे फोटो शेअर करत असते, ज्यातून तिचा फॅशन सेन्स स्पष्ट दिसून येतो.7 / 10आकांक्षाने अभिनयाच्या दुनियेत येण्यापूर्वी वाणिज्य विषयात पदव्युत्तर शिक्षण (Postgraduate in Commerce) पूर्ण केले आहे.8 / 10 गौरव आणि आकांक्षाच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर एका ऑडिशनदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. वर्षभर डेटिंग केल्यानंतर गौरव आणि आकांशाने २०१६ मध्ये लग्न केले.9 / 10गौरव व आंकाक्षा यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. दोघेही आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यांच्यात वयात बरेच अंतर आहे. आकांक्षा गौरव पेक्षा १० वर्षांनी लहान आहे. 10 / 10अभिनेता ४३ वर्षांचा आहे, तर आकांक्षा ३४ वर्षांची आहे. पण, वयातील मोठं अंतर त्यांच्या नात्यात कधीही अडथळा ठरलं नाही.