Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला कोट्यवधी कमावतो अंकिता लोखंडेचा पती, 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीपेक्षा विकीच खाऊन जातोय भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 15:25 IST

1 / 8
'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. 'बिग बॉस १७'मध्ये मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसह सहभागी झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच विकी आणि अंकिता बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहेत.
2 / 8
पण, 'बिग बॉस'च्या घरात अंकितापेक्षा विकीच जास्त भाव खाऊन जात आहे. घरातील प्रत्येक सदस्याबरोबर विकी त्याचं बाँडिंग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विकी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे.
3 / 8
अंकिताचा पती विकी जैन हा एक व्यावसायिक आहे. तो मुळचा छत्तीसगढचा आहे. मीडिया रिपोर्टनुसार विकीने एमबीएपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्याने फॅमिली व्यवसायात लक्ष घातलं.
4 / 8
विकी खूपच आलिशान आयुष्य जगतो. बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टायगर्सचा तो सहमालक आहे. मुंबईत त्याचा ८ बीएचके फ्लॅट आहे. पत्नी अंकिताबरोबर विकी या आलिशान फ्लॅटमध्ये राहतो.
5 / 8
विकी लक्झरियस गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे मर्सिडीज आणि लँड क्रुजर या महागड्या गाड्या आहेत.
6 / 8
विकीचा कोळश्याचा कौटुंबिक व्यवसाय आहे. तो एकूण जवळपास १०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
7 / 8
विकी आणि अंकिता मित्र होते. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. प्रेमात पडल्यानंतर विकीने अंकिताला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. मोठ्या धुमधडाक्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते.
8 / 8
पण, 'बिग बॉस'च्या घरात येताच विकी आणि अंकितामध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्यामध्ये वाद झाल्याचे व्हिडिओही समोर आले होते.
टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडे