Join us  

फुलराणी!! भारती सिंहने केलं मॅटर्निटी फोटोशूट; पाहा फुलांमध्ये सजलेल्या कॉमेडी क्वीनचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 10:39 AM

1 / 9
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी कॉमेडी क्वीन म्हणजे भारती सिंह.
2 / 9
भारती लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.
3 / 9
विशेष म्हणजे भारती सध्या ८ महिन्यांची प्रेग्नंट आहे तरीदेखील ती शुटींगचं काम करत आहे.
4 / 9
अलिकडेच भारतीने मॅटर्निटी फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
5 / 9
आई होणार असल्याचं तेज भारतीच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
6 / 9
भारतीने मॅटर्निटी फोटोशूटसाठी खास थीम सिलेक्ट केली होती. त्यानुसार, तिने फुलांमध्ये फोटोशूट केलं आहे.
7 / 9
भारतीने तिच्या या फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवर अवघ्या काही तासांमध्ये तीन लाख ५७ हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
8 / 9
भारतीच्या या फोटोशूटवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.
9 / 9
या फोटोव्यतिरिक्त अलिकडेच भारतीने पती हर्ष लिंबाचियासोबतही होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते.
टॅग्स :भारती सिंगसेलिब्रिटीबॉलिवूड