SEE PICS : तिचा अभिनय पाहून हसायचे लोक ...! ‘गुलफाम कली’च्या वाट्याला आला प्रचंड संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 08:00 IST
1 / 11गुलफाम कली या व्यक्तिरेखेने ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेला चार चाँद लावले. तिच्याच शब्दांत सांगायचे तर गुलफाम कली म्हणजे वरणाला दिलेली खमंग फोडणी आहे. गुलफाम कलीची भूमिका साकारणा-या अभिनेत्रीचे नाव फाल्गुनी रजनी आहे.2 / 11 फाल्गुनीने याआधी अनेक मालिकांत काम केले. मात्र ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेने ती नावारूपास आली. अर्थात इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा मार्ग सोपा नव्हता.3 / 11पहिल्यांदा मुंबईला आली तेव्हा ऑडिशन, कॅमेरा यापैकी काहीही तिला ठाऊक नव्हते.4 / 11एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत फाल्गुनीने स्ट्रगल काळातील एक किस्सा ऐकवला.5 / 11तिने सांगितले, मी आयुष्यात इतका संघर्ष केलाय की एक पुस्तक सहज लिहिले जाईल. इंडस्ट्रीत येण्याआधीही मी खूप संघर्ष केला.6 / 11पुढे ती म्हणाली, सुरूवातीला आत्मविश्वास नव्हता. कॅमेरा कसा असतो, ऑडिशन कसे देतात, काही मला माहित नव्हते. शिकून डॉक्टर किंवा इजिनियर व्हावे अशी पालकांची इच्छा होती. परंतु मी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन अभिनयात करिअर करण्याचे ठरवले.7 / 11तिने सांगितले, मला आठवते मी पहिल्यांदा ऑडिशन दिले तेव्हा सगळे जण माझ्यावर हसले होते. ते हसत होते आणि मी ऑडिशन देत होते.8 / 11 फाल्गुनी लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. लहान वयात म्हणजे 11 वीत शिकत असतानाच आई आणि दोन बहिणींची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली.9 / 11सुरुवातीला एका आर्टिफिशिअल ज्वेलरीच्या दुकानात तिने काम केले. अभिनयाची लहानपणापासून आवड असल्याने तिने या क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.10 / 11तिने आजवर खिचडी, श्रीमान श्रीमती फिरसे, हप्पू की उलटन पलटन यांसारख्या विनोदी मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या. 11 / 11 तिने साकारलेल्या गुलफाम कली ही व्यक्तिरेखा तुफान गाजली. आता तर तिला गुलफाम कली याच ओळखले जाते.